मराठवाड्याच्या विकासासाठी सर्वजण मिळून काम करू- केंद्रीय मंत्री कराड

डॉ. भागवत कराड यांचे उद्योजकांना आवाहन...

मराठवाड्याच्या विकासासाठी सर्वजण मिळून काम करू- केंद्रीय मंत्री कराड

औरंगाबाद: माझ्या हाती ९३५ दिवस शिल्लक आहे. एक एक दिवस महत्वाचा आहे. मंत्रीपद मिळाले म्हणून ‘साहेब’ झालो नाही. साहेब ऐवजी डॉ.कराड इतकाच उल्लेख पुरेसा आहे. पद मिळाल्याने केलेल्या कामांचे आॅडीट होणार आहे. मला सर्वांच्या सहकार्याची गरज असून औरंगाबादसह मराठवाड्याचा प्राधान्याने विकास करण्यासाठी सर्वजण मिळून काम करू असे भावनिक आवाहन केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केले.

उद्योजकांच्या विविध संघटनांच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यास उत्तर देताना रविवारी (दि.२२) ते बोलत होते. या कार्यक्रमात आ.हरिभाऊ बागडे, आ.अतुल सावे, प्रीतिश चॅटर्जी, रमण आचंगावकार, शिवप्रसाद जाजू, नारायण पवार, जगन्नाथ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. कराड म्हणाले, मंत्रीपद मिळाल्याने प्रत्येकाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. केवळ मागण्या करण्याऐवजी त्या पुर्णत्वास देण्यासाठी सक्षम प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करा. खासदार झाल्यानंतर औरंगाबादच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला. पीएनजी गॅस आणि इंडियन आॅइल डेपो, चिकलठाणा येथे पिटलाईन मंजूर करून घेतले, औरंगाबाद पुणे रेल्वेचे सर्वेक्षण, मनमाड ते नांदेड रेल्वे विद्युतीकरण पाठपुरावा, विभागीय जेरीयाट्रीक सेंटर, एम्स हॉस्पिटल, कन्व्हेन्शन सेंटर आणि मोठ्या आयटी पार्क साठी मागणी केलेली आहे. हे पुर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी मिळून प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करावा. पायाभूत सुविधा, उद्योग, व्यापार, रेल्वे आणि इतर विकासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

डॉ. झकेरियांशी तुलना नको
आतापर्यंत औरंगाबादचा विकास करण्यात डॉ.रफिक झकेरिया यांचे नाव आवर्जून घेतले जाते. आता त्यांच्याबरोबर डॉ.कराड यांचे नाव भविष्यात नक्कीच घेतले जाईल अशी आशा औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतिश चॅटर्जी यांनी व्यक्त केली. हाच धागा पकडून डॉ.कराड म्हणाले, डॉ.रफिक झकेरिया यांच्या बरोबर माझी तुलना करू नका. मी माझे काम करत राहणार आहे़ मंत्रीपदापर्यंतची झेप कामांमुळेच गाठू शकलो. तुमच्या मागण्यांना विकासाची ब्लु प्रिंट तयार करण्यात येईल. विविध योजना आणण्याची जबाबदारी माझ्याप्रमाणे आपली सर्वांची असल्याचे डॉ.कराड म्हणाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.