ही कसली सूडबुद्धी

अनिल देशमुखांप्रमाणेच अनिल परबांचही नाव समोर येत आहे. नारायण राणेंना अटक करण्याचे आदेश त्यांनी दिले त्यामुळे चौकशी लावण्यात आली असं म्हटलं जात आहे, पण या चौकशीमागची प्रकरणं वेगळीच आहेत.

ही कसली सूडबुद्धी

महाराष्ट्रः अनिल देशमुखांना क्लीनचिट मिळाल्याची बातमी प्रसारीत होऊ लागली आणि काही नव्या गोष्टी समोर आल्या. अनिल देशमुखांना गुंजाळ नावाच्या अधिका-याने प्राथमिक अहवालात क्लीनचिट दिल्याचं स्पष्ट होत आलं आणि सीबीआयचा खुलासा आला. हा सगळा प्रकार हास्यास्पद होता. प्राथमिक अहवालात क्लिनचीट देण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने प्राथमिक चौकशी करुन आवश्यकता असल्यास गुन्हा दाखल करावा असं म्हटलं होतं. सीबीआयने प्राथमिक चौकशी केली, गुन्हा दाखल केला याचा अर्थ देशमुख यात दोषी होते. असं असताना प्राथमिक चौकशीत निर्दोश असल्याता अहवाल कसा असु शकतो?

या निर्दोशत्वाची चर्चा चालू असतानाच आणखी एका नेत्याला ईडीने पकडलं आहे. अनिल परब यांच्यावर ईडी सूडबुद्धीने होते आहे असा दावा केला जातो आहे. अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी तिथल्या पोलिसांना नारायण राणेंना अटक करण्यासाठी सुचना दिल्या. या सुचना देत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला त्याचा राग येऊन केंद्र सरकारने त्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली असं म्हटलं जात आहे. मुळात अनिल परबांची ईडीची चौकशी, नारायण राणेंच्या अटकेच्या सुचना दिल्या, दबाव टाकला म्हणून केली जाते आहे, असं म्हणणंच हास्यास्पद आहे.

जसं अनिल देशमुख सर्वोच्च न्यायलयातुन उच्च न्यायालयात आले होते. सीबीआयने प्राथमिक चौकशी करावी आणि या चौकशीत आवश्यकता वाटल्यास गुन्हा दाखल करावा असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. तसंच अनिल परबांवर अनेक आरोप आहेत, अगदी पोलिसांच्या बदलीच्या प्रकरणात आणि वसुलीच्या प्रकरणातही त्यांच्यावर आरोप आहेत. सचिन वाझेंनी न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात अनिल परबांनी वसुलीसाठी बोलवल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. अनिल परबांनी याबाबत सचिन वाझेशी संपर्क साधला होता असं वाझे स्वतः कोर्टासमोर सांगतो आहे. याचा अर्थ अनिल देशमुखांइतकेच अनिल परबही जबाबदार आहेत. यामुळे अनिल परबांची प्राथमिक चौकशीही केली जावी. ही चौकशी नारायण राणेंना अटक करायला सांगितली म्हणून नाही तर वाझेला वसुलीसाठी बोलवल्यामुळे आहे.

अनिल परबांच्या मागे आणखी काही प्रकरणं लागली आहेत. सीआरझेडचं उल्लंघन करुन त्यांनी आपलं कोट्यावधी रुपयांच रिसॉर्ट बांधलं आहे. हे जिल्हाधिका-यांचा चौकशी अहवालातुन समोर आलं आहे. इथे महसुली यंत्रणा सीआरझेडचं उल्लंघन झाल्याचा दावा करते आहे. या कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेच्या आणि वाझेच्या चौकशीमध्ये घेतलेल्या कबुलीच्या पत्रामध्ये अनिल परबांचा उल्लेख असणं, वाझेची वसुलीसाठी नियुक्ती केली म्हणून अनिल देशमुखांवर सीबीआय आणि ईडीची चौकशी चालू आहेत. त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे त्यामुळे आता अनिल परबांची वेळ आली आहे. त्यामुळे अटकेचे आदेश दिले म्हणून चौकशी होत नाही तर जुन्याच प्रकरणांची चौकशी चालू आहे.

आता अनिल परबांवर सूडबुद्धीने कारवाई केली जाते आहे असं का म्हटलं जात आहे? तर याचं प्रमुख कारण म्हणजे परबांचा थेट संबंध मातोश्रीसोबत आहे. ते जर अडकले तर कदाचित यातील मातोश्रीचा सहभागही उघड होऊ शकतो. त्यामूळे हे सूडबुद्धीने चालू आहे, परब अत्यंत प्रामणिक आहेत, असं सातत्याने म्हटलं जात आहे. पण सध्या परबांची चौकशी ही सूडबुद्धीने नाही तर जुन्याच प्रकरणांचा तपास हळू हळू पुढे जात असल्यामुळे चालू आहे. अनिल परबांवर चौकशीचा शिकंजा पोहोचल्याबरोबर त्याच्या कळा, वेदना मातोश्रीपर्यंत जाणार हे नक्की. म्हणूनच त्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.