फडणवीसांच्या मनात नेमकं काय? काल शरद पवारांच्या भेटीनंतर आज एकनाथ खडसेंच्या घरी

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण...

फडणवीसांच्या मनात नेमकं काय? काल शरद पवारांच्या भेटीनंतर आज एकनाथ खडसेंच्या घरी

राज्य : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. फडणवीसांच्या या भेटीमुळं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे.

मान्सूनपूर्व वादळी पावसाने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात गेल्या आठवड्यात मोठे थैमान घातले. यात केळीच्या बागांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिली. या ठिकाणी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
khadse-home
एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खडसेंचा हा निर्णय भाजपसाठी धक्कादायक होता. फडणवीस यांच्यामुळेच आपल्याला भाजप पक्ष सोडावा लागला, असा आरोप खडसे यांनी त्यावेळी केला होता. तरीसुद्धा फडणवीस यांनी त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.