नितीश कुमारांसोबत घात झाला- रोहित पवार

1 min read

नितीश कुमारांसोबत घात झाला- रोहित पवार

‘भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं,’ अशी टिका पवार यांनी भाजपवर केली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळाले आहे. यामध्ये विविध राजकीय स्तरावरून प्रतिक्रिया उमटल्याचे दिसत आहे. मात्र या निवडणुकीमधील खरे हिरो आरजेडी नेते तेजस्वी यादव असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत व्यक्त केलं आहे. बिहारच्या निवडणुकीत भाजपला जेडीयूपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. यावरून पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं,’ अशी टिका पवार यांनी भाजपवर केली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. तर,आरजेडी आणि काँग्रेस आघाडीला बहुमत गाठता न आल्याने सत्तांतर घडवण्यात अपयश आले आहे. या निवडणुकीत एनडीए बाजी मारणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. याच दरम्यान रोहित पवार यांनी ट्विट करीत बिहार निवडणुकीवर भाष्य केलं होत.

twit