पुरोगामी म्हणजे काय रे दादा?

पुरोगामी असणं म्हणजे विचारांनी, आचारांनी सुधारलेली कृती करणं असा सरसकट अर्थ आपण घेतो. पण आजकालची पुरोगामीत्वाची व्याख्या तपासल्यावर हे पुरोगामीत्व म्हणजे काय? असा प्रश्न अनेकांना पडतो.

पुरोगामी म्हणजे काय रे दादा?

महाराष्ट्रः राज्य पुरोगामी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रात सगळं काही चांगलं घडावं असं लोकांना अपेक्षित आहे. पुरोगामी असणं म्हणजे विचारांनी, आचारांनी सुधारलेली कृती करणं असा सरसकट अर्थ आपण घेतो. पण आजकालची पुरोगामीत्वाची व्याख्या तपासल्यावर हे पुरोगामीत्व म्हणजे काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. आता पुरोगामीत्वाची व्याख्याच साधी सरळ झाली आहे. पुरोगामी स्त्री कशी ओळखावी? तर काठापदराची साडी, गळ्यात मंगळसुत्र नाही, कपाळावर मोठं गोल कुंकु किंवा टिकली लावलेली, अशी महिला दिसली तर ती पुरोगामी समजावी. आणि चुरगळलेले कपडे घालुन सतत काहीतरी वेगळंच बोलणा-या पुरुषांना पुरोगामी म्हणावं. हिंदुंना शिव्या देणारे, ब्राह्मण बाहेरुन आले आहेत असं म्हणनारे, ब्राह्मण, हिंदु स्त्रीयांवर नको ते आरोप करणारे, राम, कृष्ण, सीता, लक्ष्मण ही पात्र काल्पनिक आहेत, ते केवळ काव्य होतं असं सांगणारे पुरोगामी असतात.

म्हणजे जो मुस्लिमांच्या रुढींवर, ख्रिश्चनांच्या अंधश्रद्धेवर आरोप करत नाही पण हिंदुंच्या अंधश्रद्धेवर आरोप करुन हे बंद झालं पाहिजे असं म्हणतो, तो पुरोगामी. 'नव-याला मी सोडलं आहे' असं म्हणनारी स्त्री पुरोगामी असते. पुरोगामीत्वाची इतकी साधी सरळ व्याख्या झाल्यावर उर्वरीत सगळे लोक प्रतिगामी असतात. जेव्हा एखाद्या राजकीय सत्तेकडुन या पुरोगामीपणाची उदाहरणं दाखवताना वेगवेगळ्या धार्मिक उत्सवांवर बंधनं येतील तेव्हा ती राजसत्ता पुरोगामी, अन्यथा अशा कार्यक्रमांना हजर राहणारा सत्ताधिश प्रतिगामी. एखादा सत्ताधिश वाराणसीच्या मंदिरात अभिषेक करत असेल किंवा केदारनाथच्या गुहेत ध्यानस्त बसणार असेल तर तो प्रतिगामी, पण असाच सत्ताधिश वैष्णव देवीच्या मंदिरात दर्शनाला जाणार असेल तर तो मात्र पुरोगामी. असंच ध्यानस्त एखाद्या मंदिराच्या बाहेर पहिला पंतप्रधान बसणार असेल तर तो पुरोगामी, पण बद्रिनाथ- केदारनाथच्या मंदिरात गेला तर तो प्रतिगामी. इतकी साधी, सोपी व्याख्या पुरोगामी आणि प्रतिगाम्यांची आहे.

महिलांसाठी या देशात शौचालयाची व्यवस्था नव्हती, त्यावेळी स्त्रीयांची होणारी कुचंबना लक्षात घेऊन ती थांबवण्यासाठी काम केलं जातं त्याला पुरोगामी म्हणायचं की प्रतिगामी म्हणायचं? ज्या देशात तीन तलाख मुळे अनेक स्त्रीयांची आयु्ष्य उध्वस्त झाली, पुढे त्यांच्या आयुष्याचं काय झालं याचा विचारही कोणी करत नाही. ही तीन तलाखाची पद्धत थांबवणं याला पुरोगामी म्हणायचं की प्रतिगामी? ज्या देशात 370 सारखं कलम होतं, ज्यामुळे या देशाचा भुभाग आमचाच आहे हे सांगता येत नव्हतं. जम्मु काश्मिर सारखा भाग भारताताच अविभाज्य भाग असुनही वेगळं निशाण वापरलं जात, तिथे हे संपवणं म्हणजे पुरोगामीत्व आहे की प्रतिगामीत्व? हे आता आपल्याया ठरवावं लागेल.

चुलीचा धुर, रॉकेलची समस्या संपली आहे आणि बहुतेक घरात आता गॅस आला आहे. अनेक घरात या गॅसच्या किंमती बाबत अडचणी असतील मात्र अनेक घरांत आता गॅस पोहोचला आहे आणि महिलांची धुरामुळे होणारी कुचंबना थांबली हे पुरोगामीत्वच आहे. पुरोगामीत्व म्हणजे जिथे स्त्रीयांना कधीही संपत्तीतला वाटा मिळाला नव्हता आणि तो मिळावा असं पुरुषांना वाटत देखील नव्हतं. तिथे किमान प्रधानमंत्री घर योजनेचं अनुदार पदरी पडावं म्हणून स्त्रीयांसोबत घराची मालकी केली जाऊ लागली आणि स्त्रीला संपत्तीमधील समान वाटा कागदोपत्री मिळू लागला. याला पुरोगामी निर्णय म्हणायचं की प्रतिगामी निर्णय म्हणायचं हे आपणंच ठरवायचं आहे. या शब्दांची व्याख्या प्रत्येकाच्या मनावर आहे, आपल्याला हवी तशी त्याची व्याख्या आपण करु शकतो. या विधानाचा अनेक लोक विरोध करु शकतात. पण पुरोगामीत्वाचा ठेका काही विशिष्ट लोकांकडेच आहे आणि त्यांनीही आपली पुरोगामीत्वाची व्याख्या तपासुन पाहणयाची आता वेळ आली आहे. हिंदु देवतांना, हिंदु स्त्रीयांना शिव्या घालणं म्हणजे पुरोगामीत्व, हिंदु धर्मातुन शोधुन काढलेल्या अडचणी म्हणजे पुरोगामीत्व, हवा तसा अर्थ घेऊन धर्म सांगणे म्हणजे पुरोगामीत्व असं ज्यांना वाटतं त्यांनी वर सांगितलेल्या गोष्टीही पुरोगामीत्वाच्याच व्याख्येत येतात हे लक्षात घेतलं पाहिजे.

  • सुशील कुलकर्णी

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.