घटस्थापना म्हणजे काय? जाणून घ्या माहिती

यंदा 9 नाहीतर 8 दिवसांचा नवरात्रोत्सव

घटस्थापना म्हणजे काय? जाणून घ्या माहिती

नवरात्रोत्सव हा सण नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्याचा आहे. पावसाळा बहुतेक संपलेला असतो. शेतांतील पिके तयार होत आलेली असतात. काही तयार झालेली असतात आणि शेतकरी खुशीत असतो. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ दिवस नऊ महिन्यांत संतती प्राप्त होते. तसेच बी जमिनीत रोवले असता तेही नऊ दिवसांत उगवते. याच दिवसांत घटामध्ये धान्य पेरून दिवे लावून देवीपुढे ठेवतात. घटस्थापनेसाठी शेतातील माती, पाच प्रकारचे धान्य, घट, धान्यामध्ये साळी, गहू, इतर कडधान्ये तसेच विड्याची पाने, नाणी, सुपारी, धूप, दोरा, कुंकू, हळद, गुलाल आणि अक्षता इत्यादी गोष्टींची आवश्यकता असते.

नऊ दिवस देवांची पूजा त्या देवांना देव्हाऱ्यातून बाहेर न काढता केली जाते. प्रत्येक घरी काही वेगवेगळ्या पद्धती असतात. घटस्थापनेला घरी भट- सवाष्ण जेवायला बोलावतात. काही घरांमध्ये कुमारिकेला देवीचे प्रतीक मानून तिची पूजा केली जाते तसेच तिला जेवायला वाढतात. नऊ दिवस सप्तशतीचा पाठ वाचला जातो. नऊ दिवस नंदादीप तेवत असतो. काही घरात फक्त तिळाच्या तेलाचाच दिवा लावतात. रोज एक माळ देवाच्या डोक्यावर बांधली जाते. त्यामध्येदेखील तिळाच्या फुलांच्या माळेला अधिक महत्त्व आहे. अशा एकूण नऊ माळा बांधल्या जातात.
काही घरांमध्ये देवाशेजारी धान्याची पेरणी केली जाते. त्या धान्याला अंकुर येतात. ते दसऱ्याच्या दिवशी टोपीत किंवा पागोट्यात घालतात. नवव्या दिवशी होम होतो. होमात कोहळा अर्पण करतात व शेवटच्या दिवशी होमहवन होऊन याचे उत्थापन व विसर्जन विजयादशमीला होते. विजयादशमीला म्हणजेच दसऱ्याला आपट्याच्या पानांची पूजा केली जाते त्यानंतर उत्सवाची सांगता होते.
यंदा 9 नाहीतर 8 दिवसांचा नवरात्रोत्सव
शारदीय नवरात्र 7 ऑक्टोबर गुरुवारपासून सुरु होऊन 14 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. परंतु, नवरात्रीमध्ये 9 दिवसांपर्यंत देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. असे म्हटले जातेय की, या दिवसांत देवीचे व्रत आणि पूजा अर्चना केल्याने देवी स्वतः पृथ्वीवर येऊन आपल्या भक्तांचे दुःख हरण करते. नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत खास असतात. घरात, कुटुंबात आनंदाचे वातावरण असते.

शारदीय नवरात्र यंदाच्या वर्षी गुरुवारी सुरु होऊन, गुरुवारीच संपन्न होणार आहे. एक तिथीचा लोप झाल्याने यंदा नवरात्री आठ दिवस साजरा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत गुरुचा विशेष योग जुळून येणार आहे. 7 ऑक्टोबर गुरुवारी अश्विन शुक्ल पक्ष एकमपासून सुरु होऊन दुर्गा महानवमी 14 ऑक्टोबरपर्यंत साजरी होणार आहे. तसेच 15 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.