औरंगाबाद-नागपूरमध्ये काय आहे बेडची स्थिती..?

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येसाठी कशी आहे जिल्हा प्रशासनाची बेडची व्यवस्था...

औरंगाबाद-नागपूरमध्ये काय आहे बेडची स्थिती..?

दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. सुरूवातीच्या काळात कोरोना झपाट्याने वाढल्यामुळे उपचारासाठी रुग्णांना बेड कमी पडले होते. अनेक ठिकाणी बेड न मिळाल्याने उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. मात्र आता आरोग्य यंत्रणा किती सज्ज आहे. असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. कशी आहे जिल्हा प्रशासनाची तयारी पाहुया...

औरंगाबाद महापालिका बेड नियोजन

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण - ८१४

एकूण बेड - ४७५५
रुग्णांना दिलेले बेड - ९०२
शिल्लक बेड - ३८५३

DCH & DCHC बेड - २७५५
रुग्णांना दिलेले बेड - ८०४
शिल्लक बेड - १९५१

ICU बेड - ४०७
रुग्णाना दिलेले बेड - १०९
शिल्लक बेड - २९८

ऑक्सिजन बेड - १०१५
रुग्णांना दिलेले बेड - १२३
शिल्लक बेड - ८९२

व्हेंटिलेटर बेड -२२९
रुग्णांना दिलेले बेड - ४८
शिल्लक बेड - २५१

नागपूर शहरातील बेड नियोजन

नागपूरात २ डेडिकेटेड कोविड केयर सेंटर (DCC) आहेत
GMC हॉस्पिटलमध्ये १००० बेड्सची क्षमता
मेयो हॉस्पिटलमध्ये ६६० बेड्सची क्षमता
नागपुरात सध्या १ कोविड केयर सेंटर (CCC)
पाचपाऊली १५० बेड्सची क्षमता
नागपूर मनपाचे २ डेडिकेटेड कोविड केयर हेल्थ सेन्टर (DCHC)
आयसोलेशन दवाखाना ३५ बेड्स
इंदिरा गांधी महापालिका हॉस्पिटल ११० बेड्स


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.