काय आहे धनत्रयोदशीचे महत्व? का साजरी केली जाते?

धनत्रयोदशी का साजरी केली जाते peCgv Id/e

काय आहे धनत्रयोदशीचे महत्व? का साजरी केली जाते?

धनतेरस हा शब्द ‘धन’ आणि ‘तेरस’ या दोन शब्दांपासून बनला आहे. या शब्दात धन म्हणजे पैसा आणि तेरस हा तेरा अंकांशी संबंधित आहे. वास्तविक हा सण हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या १३ व्या दिवशी येतो म्हणून याला धनत्रयोदशी म्हणतात.

दिवाळी आनंदाचा आणि उत्साहाचा सण. या सणात धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती, धन यांच्याबद्धल आपल्या मनात असलेले प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो.व्यापारी आणि शेतकरी वर्गात हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्वत्र मिठाई आणि गोडधोड पदार्थांचे वाटप केले जाते. नोकरी, व्यवसाय यानिमीत्त परगावी असलेली कुटूंबातील मंडळी एकत्र येतात. आनंदाने दिवळी साजरी करतात.

धनत्रयोदशी म्हणजे काय ?
आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हटले जाते. धनाची पूजा करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो. आजच्या दिवशी शेतकरी व कारागीर लोक आपल्या व्यवसायाशी संबंधीत अवजारांची पूजा करतात. शेतकरी नांगर, तिफन, कुळव यांसारख्या शेतीशी संबंधीत सर्व अवजारांची पूजा करतात. तर व्यापारी दिवशी पाटावर लक्ष्मीची मुर्ती ठेवून तीची पूजा करतात. हिशोबाच्या वह्या, सोने-नाणे तसेच लिखापडीसाठी आणलेल्या वह्यांचीही या दिवशी पूजा केली जाते.

शेतऱ्यांसाठी शेतातून आलेले नवे धान्य हेच त्याचे खरे धन असते. हीच त्याची संपत्ती असते. त्यामुळे तो धान्याची पूजा करतो. त्यासाठी धने, गुळ, खोबरे व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच झेंडू, शेवंती यांच्या फूलांचा हार, फुले देवाला वाहतात. आजच्या दिवशी अंगणभर पणत्या लावल्या जातात. घरांना विद्यूत रोषनाई केली जातो. घरे, गाव, शहरे व सारा आसमंत पणत्या आणि विद्यूत रोषनाईने उजळून निघतो. व्यापाली व शेतकरी वर्गात आजचा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.

धनत्रयोदशी का साजरी केली जाते?
भारतीय संस्कृतीत आरोग्य हा भाग संपत्तीच्या वरचा मानला गेला आहे. ‘पहिले सुख निरोगी शरीर, दुसरे सुख घरात’ ही म्हण आजही प्रचलित आहे, म्हणून दीपावलीत धनत्रयोदशीला प्रथम महत्त्व दिले जाते. जे भारतीय संस्कृतीला पूर्णपणे अनुकूल आहे.

शास्त्रात सांगितलेल्या कथांनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हा विष्णूचा अवतार असल्याचे मानले जाते. जगात वैद्यकशास्त्राचा विस्तार आणि प्रसार व्हावा यासाठी भगवान विष्णूंनी धन्वंतरीचा अवतार घेतला. धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीच्या रूपाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.धन्वंतरीच्या जन्मानंतर दोन दिवसांनी देवी लक्ष्मी प्रकट झाली. म्हणूनच दीपावलीच्या दोन दिवस आधी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.