काय आहे धनत्रयोदशीचं महत्व ?

1 min read

काय आहे धनत्रयोदशीचं महत्व ?

आपल्याकडे असलेली संपत्ती, धन यांच्याबद्धल आपल्या मनात असलेले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो.

दिवाळी आनंदाचा आणि उत्साहाचा सण. या सणात धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती, धन यांच्याबद्धल आपल्या मनात असलेले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो. व्यापारी आणि शेतकरी वर्गात हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्वत्र मिठाई आणि गोडधोड पदार्थांचे वाटप केले जाते. नोकरी, व्यवसाय यानिमीत्त परगावी असलेली कुटूंबातील मंडळी एकत्र येतात. आनंदाने दिवाळी साजरी करतात.
आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हटले जाते. धनाची पूजा करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो. आजच्या दिवशी शेतकरी व कारागीर लोक आपल्या व्यवसायाशी संबंधीत अवजारांची पूजा करतात. शेतकरी नांगर, तिफन, कुळव यांसारख्या शेतीशी संबंधीत सर्व अवजारांची पूजा करतात. तर व्यापारी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मुर्ती ठेवून तीची पूजा करतात. हिशोबाच्या वह्या, सोने-नाणे तसेच लिखापडीसाठी आणलेल्या वह्यांचीही या दिवशी पूजा केली जाते.शेतकऱ्यांसाठी शेतातून आलेले नवे धान्य हेच त्याचे खरे धन असते. हीच त्याची संपत्ती असते. त्यामुळे तो धान्याची पूजा करतो. त्यासाठी धने, गुळ, खोबरे व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच झेंडू, शेवंती यांच्या फुलांचा हार, फुले देवाला वाहतात. आजच्या दिवशी अंगणभर पणत्या लावल्या जातात. घरांना विद्यूत रोाषणाई केली जाते. घरे, गाव, शहरे व सारा आसमंत पणत्या आणि विद्यूत रोषणाईने उजळून निघतो. व्यापारी व शेतकरी वर्गात आजचा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.