व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन । युजरवर मोठा परिणाम

जगप्रसिद्ध मेसेंजर व्हाट्सअँप तसेच फेसबुक आणि इंस्टाग्राम तांत्रिक अडचणीमुळे बंद असल्याने, भारतीय युजर्स वर मोठा परिणाम

व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन । युजरवर मोठा परिणाम


ऋषिकेश शेवतेकर/मुंबई: जगप्रसिद्ध मेसेंजर व्हाट्सअँप तसेच फेसबुक आणि इंस्टाग्राम तांत्रिक अडचणीमुळे बंद असल्याने, भारतीय युजर्स वर मोठा परिणाम दिसून येत असून सेवा ठप्प होण्याची कारणे अजून पर्यंत समजलेले नाही. फेसबुकने आपल्या वेबसाईटवर मॅसेज लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. “माफ करा, काहीतरी चुकीचं झालं आहे. आम्ही गुंता सोडवण्याचं काम करत आहोत. लवकरच सर्व काही सुरळीत होईल”, असं फेसबुकनं आपल्या मॅसेजमध्ये लिहीलं आहे.

अनेक वापरकर्त्यांनी सोशल मेडिया वापरातील ३ महत्वाचे अँप अचानक बंद झाल्याने ठिकठिकाणच्या नेटवर्क ऑफिस मध्ये जाऊन नेट बंद झाल्याच्या तक्रारी नोंदविल्या आहेत. भारतात फेसबुकचे ४१० दशलक्षाहून अधिक, व्हॉट्सअ‍ॅपचे ५३० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. इन्स्टाग्रामचे भारतात २१० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे.

ट्विटर वर मिम्स चा धुमाकूळ

फेसबुक व्हाट्सअँप आणि इंस्टाग्राम ची सेवा ठप्प असल्याने याबाबतचे मिम्स बनवून ट्विटर वर पब्लिश केल्याचे दिसून येत आहे, वापरकर्ते व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक डाऊन असल्याने ट्वीटरवर पोस्ट करत आहेत. व्हाट्सअँप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची  सेवा ठप्प होण्यामागे नेमकी कारणे कोणती होती हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. व्हाट्सअँप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाल्याने भारतातील लोक सतत हे  अकाउंट सुरू झाले का याची तपासणी करत आहेत.

लवकरात लवकर सेवा सुरु करण्याचा प्रयत्न

आम्ही गुंता सोडवण्याचं काम करत आहोत. लवकरच सर्व काही सुरळीत होईल”, असे ट्विट फेसबुक तसेच व्हाट्सअँप द्वारे ट्विटर वर करण्यात आले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.