F.R.I.N.D.S मधील गंथर काळाच्या पडद्याआड

F.R.I.N.D.S मधील गंथर काळाच्या पडद्याआड

तरुणाईच्या सर्वात लाडक्या वेबसिरीदजपैकी असणाऱ्या फ्रेण्ड्स या मालिकेमध्ये लोकप्रिय पात्र साकारणाऱ्या गंथरचा मृत्यू झाला आहे. फ्रेण्ड्स मालिकेतील लोकप्रिय ठिकाण असणाऱ्या सेंट्रल कॅफेचा मॅनेजर म्हणजेच गंथर ही भूमिका साकारणाऱ्या जेम्स मायकल टेलरचं निधन झालं आहे. जेम्स हा ५९ वर्षांचा होता.

जून २०२१ मध्ये एनबीसीला दिलेल्या मुलाखतीत मायकलने त्याला स्टेज फोरचा कॅन्सर असल्याचं जाहीर केलं होतं. २०१८ पासून तो कॅन्सरशी लढत होता. मात्र आज पहाटे त्याची ही झुंज अपयशी ठरली. त्याच्या मृत्यूसंदर्भात त्याच्या कुटुंबियांनी एक पत्रक जारी केलं आहे.

“जग त्याला गंथर नावाने ओळखायचे मात्र त्याच्या जवळचे त्याला एका अभिनेता, गीतकार, कॅन्सरबद्दल जागृती करणारा आणि प्रेम नवरा म्हणून ओळखत होते. मायकलला लाइव्ह म्युझिक फार आवडायचं. त्याला एकदा भेटलात तरी तुम्ही आयुष्यभर त्याचे मित्र होता, असा होता तो,” असं त्याच्या कुटुंबाने पत्रकात म्हटलं आहे.फ्रेण्ड्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅण्डलवरुनही त्याला श्रद्धांजली अर्पण करण्यात आलीय. तो आमच्या फ्रेण्ड्स कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.