काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी ?

बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्ष प्रभारी आणि हायकमांडची आज दि. ४ जानेवारीला भेट घेणार असून ते आपल्या प्रदेशअध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी ?

स्वप्नील कुमावत/मुंबई : राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्ष प्रभारी आणि हायकमांडची आज दि. ४ जानेवारीला भेट घेणार असून ते आपल्या प्रदेशअध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेसला नवा प्रदशेअध्यक्ष मिळणार आहे. प्रदेशअध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागते ते पहावे लागेल.  

राज्यातील काँग्रेसला पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष मिळावा अशी चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरु होती, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्यापेक्षा स्वत:हून या पदातून मुक्त होण्याची तयारी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी दुसऱ्या नेत्याची नेमणूक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत, यात मुख्यत: विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे, विदर्भात काँग्रेसला मिळालेले यश पाहता विदर्भातून नाना पटोले, नितीन राऊत, यशोमती ठाकूर तर मराठवाड्यातून अमित देशमुख यांचेही नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.