स्वप्नील कुमावत / मुंबई : राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष बाळासाहेब थोरात आज दि.४ जानेवारी रोजी काँग्रेस हायकमांडची भेट घेवून आपल्या प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहे. यामुळे काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागेल ते पहावे लागेल. प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची नावं चर्चेत आहेत, यात मुख्यत: विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे, विदर्भात काँग्रेसला मिळालेले यश पाहता विदर्भातून नाना पटोले, नितीन राऊत, यशोमती ठाकूर तर मराठवाड्यातून अमित देशमुख यांचेही नाव प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चेत आहे.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोण देणार राजीनामा ?
काँग्रेसला पुर्ण वेळ प्रदेश अध्यक्ष पाहिजे. सध्या नाना पटोले, नितीन राऊत, यशोमती ठाकूर आणि अमित देसमुख या नेत्यांची नावं चर्चेत आहे. या सर्व नेत्यांपैकी नितीन राऊत उर्जा मंत्री, यशोमती ठाकूर महिला आणि बालविकास मंत्री, अमित देशमुख वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून सरकारमध्ये मंत्री आहे. तर नाना पटोले विधानसभा अध्यक्ष आहे. त्यामुळे आता प्रदेश अध्यक्ष पदासाठी कोण राजीनामा देणार ते पहावे लागेल.
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पदावरून आता चांगलेच राजकारण तापले. परंतू आता प्रदेश अध्यक्ष पदासाठी कोण आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देणार ते पहावे लागेल, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले प्रदेश अध्यक्ष पदासाठी राजीनामा देतील का ? जर नाना पटोले यांनी राजीनामा दिला तर कोण विधानसभेचा अध्यक्ष असेल, देशमुख, ठाकूर, राऊत यांच्यापैकी कोण राजीनामा देणार आणि त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागेल हे देखील पहावे लागेल.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोण देणार मंत्रीपदाचा राजीनामा ?
नाना पटोले देणार का राजीनामा ?, मंत्रीपदावरून कोणाची होणार गच्छंती ?

Loading...