खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी नेत्यांचा राजकीय बळी का घेतला?- रोहिणी खडसे

रोहिणी खडसे यांचा देवेंद्र फडणवीसाना प्रश्न

खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी नेत्यांचा राजकीय बळी का घेतला?- रोहिणी खडसे

मुंबईः ओबीसींचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. तर आरक्षणासाठी एकीकडे भाजपने चक्का जाम आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

रोहिणी खडसे यांनी भाजपाला प्रश्न विचारला आहे. की ते आंदोलन करतांना मा.खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना.. असे ट्विट केले आहे.

“आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर 1/8/2019 रोजी तसेच दि. 18/9/2019 रोजी राज्य सरकारकडून केंद्राकडे इंपिरिकल डाटा मागितला होता ना? तो मिळाला नाही. खरंतर तेव्हाच अध्यादेशाद्वारा केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाही, हे तुम्हाला माहित व्हायला हवे होते” असे ट्विट करून रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही प्रश्न केला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.