गृहमंत्रीपदी या पाटलांची लागणार वर्णी?

अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला

गृहमंत्रीपदी या पाटलांची  लागणार वर्णी?

मुंबईः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ट्वीट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अनिल देशामुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता गृहमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार? आसा प्रश्न निर्माण झाला आहे.

अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी होणार असल्याने अखेर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला .

गृहमंत्रीपदासाठी जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. नेमके कोणा कडे राज्याचे गृहखाते जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जयंत पाटील मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या गृहमंत्रिपदावर वीज कोसळली होती. त्यावेळी डिसेंबर २००८ मध्ये जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला होता. त्यानंतर जवळपास वर्षभर जयंत पाटलांनी ही धुरा सांभाळली. म्हणजेच संकटकाळात गृह मंत्रिपदाचा भार सहन करण्याची ताकद जयंत पाटलांकडे आहे, त्यामुळे त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. वळसे पाटील यांना राज्यकारभाराचाही अनुभवही मोठा आहे. त्याचबरोबर अशा परिस्थितीत एक क्लिन इमेज राष्ट्रवादी काँग्रेसला गरजेची आहे. त्यामुळे वळसे-पाटलांकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.