संजय राठोड यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होणार काय?

संजय राठोड यांचे पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तसे संकेतच दिले आहेत.

संजय राठोड यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होणार काय?

औरंगाबादः माजी वनमंत्री शिवसेना आमदार संजय राठोड यांचे पुन्हा मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तसे संकेतच दिले आहेत.पूजा चव्हाण प्रकरणी वन मंत्रालयाचा राजीनामा द्यावा लागसा होता. माझ्या मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील, असे संजय राठोड यांनी औरंगाबादच्या दौऱ्यावर आसताना सांगितले.

संजय राठोड हे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मी सध्या संभाजीनगरचा दौरा करत आहे. माझ्या समाजातील आणि भटक्या समाजातील बांधवाना भेटत आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रश्न आहे. माझ्या मंत्रीपदाबाबद्दल मला काही बोलायचे नाही. याबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील. मला त्याबद्दल काहीही बोलायचे नाही, असे राठोड यांनी सांगितले.

राठोड यांचे पुनरागमन झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. चंद्रकांत पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं वक्तव्य मी ऐकलं नाही. चित्रा वाघ यांची प्रतिक्रियाही मी पाहिली नाही. त्यामुळे मी त्याबद्दल बोलू शकणार नाही, असे सांगतानाच मी मंत्री व्हावा ही माझ्या समाजाची अपेक्षा आहे. पण मी विधिमंडळाचा सदस्य आहे, समाजाचे प्रश्न सोडवत राहीन, असे त्यांनी सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.