प्रशासन गांभीर्याने घेईल का? कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू  झाल्यानंतरही प्रतिबंधित क्षेत्र नाही.

1 min read

प्रशासन गांभीर्याने घेईल का? कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही प्रतिबंधित क्षेत्र नाही.

प्रशासनाकडून दिरंगाई कशामुळे लावण्यात आली यावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: आजपर्यंत कारवाई करण्यात आलेल्या प्रशासनाकडून मात्र प्रतिबंधित क्षेत्र करण्यास वेळ घालवल्याने गेंड्याची कातडी पांघरलेले प्रशासन अशी चर्चा सोनपेठमध्ये प्रशासनाबद्दल झाली आहे. सोनपेठचे तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ मध्ये कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत मोठ्या प्रमाणात कार्यवाह्या करण्यात येऊन कोरोना सोनपेठपासून अलिप्त ठेवण्यात यश आलेले आहे. मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू  झाल्यानंतरही प्रशासनाकडून प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यास दिरंगाई करण्यात आलेली आहे. यामुळे सायखेडा गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून. प्रशासनाकडून दिरंगाई कशामुळे लावण्यात आली यावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत.दरम्यान या प्रकरणाची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र माहिती देऊनही प्रतिबंधित क्षेत्र का करण्यात आले नाही. असा सवालही ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. एकीकडे शासनाकडून प्रशासनाच्या माध्यमातून कोरोनाला रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत.मात्र सोनपेठमध्ये गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून कोरोनाबाबत सतर्कता घेतली जात नसल्याने. सामान्यामध्ये ग्रामीण रुग्णालय कोरोनाबाबत जागरूक आहे का?असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.