राज्य सरकार विमान-रेल्वेसेवा बंद करणार ?

1 min read

राज्य सरकार विमान-रेल्वेसेवा बंद करणार ?

दिल्लीत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताय, त्यासाठी खबरदारी म्हणून राज्य सरकार दिल्लीपुरती ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते

दिल्लीतील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता खबरदारी म्हणून मुंबई-दिल्लीमधील हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद ठेवण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. याबाबतचा निर्णय येत्या एक-दोन दिवसांत घेतला जाऊ शकतो.
राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे दिल्लीत काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे दिल्लीतील परिस्थिती लक्षात घेता मुंबईतही काळजी बाळगली जात आहे.
मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-मुंबई हवाई त्यासोबत रेल्वे प्रवास बंद करण्यासाठीचा पत्र व्यवहार संबंधित विभागांना केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकरच यासेवा बंद होऊ शकतात.