चाहूल हिवाळ्याची.....

चाहूल हिवाळ्याची.....

लवकर पडणारा अंधार आणि सकाळी-संध्याकाळी वाहणारे गार वारे यामुळे मन प्रसन्न होत.यातुनच हिवाळ्याची चाहूल लागलीय अस कळतं तर दुसरीकडे आपलं शरीरही या ऋतुत समाविष्ठ होण्यासाठी तयार होत असतं. म्हणजेच बाह्य आणि अंतर्गत काही बदल जाणवायला लागतात. ते ओळखणं आणि त्यानुसार सौंदर्य, डाएटची काळजी घेणं आवश्यक असतं.

हिवाळा काय बदल आणतो?
सर्वांना संपूर्ण वर्षभर आपली त्वचा कोमल, तजेलदार आणि सुरकुत्या विरहित हवी असते. त्यासाठी शरीराअंतर्गत घडामोडी आणि वातावरणातील बाह्य घटक जबाबदार असतात, हे लक्षात घ्या. बाह्य वातावरणातील ऋतुचा त्वचेवर परिणाम होत असतो. ऋतुच्या निर्मितीसाठी सूर्य कारणीभूत आहे. सूर्य वातावरणात बदल आणत असताना ऋतुही शरीरावर परिणाम करतात. आता हिवाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. गार वारे वाहू लागल्यानं त्वचेचा संकोच होऊन घाम येईनासा होतो आणि त्वचेतील आर्द्रतेचं प्रमाणही कमी होतं. याच काळात वातदोष बलवान होतो आणि शीतगुण वाढीस लागतो. याचा परिणाम केसांवर, त्वचेवर दिसू लागतो. हाता-पायाची त्वचा कोरडी पडणं, तळहात-तळपायाला भेगा पडणं, केस रुक्ष होऊन दुभंगणं तसंच चेहऱ्याची आणि ओठांची त्वचाही कोरडी पडणं, स्कीन अॅलर्जी, एक्झिमा यांसारख्या तक्रारी जाणवू लागतात.

कशी घ्याल काळजी?
नवीन ऋतुशी शरीराला जसं जुळवून घ्यावं लागतं, तसंच त्वचेलाही जुळवून घ्यावं लागतं. ऋतुतील बदल सौम्य व्हायला थोडासा वेळ लागतो; कारण हा बदल एका रात्रीत होत नसतो. यासाठी नवीन ऋतुमुळे होणारे बदल आणि त्यांची माहिती असणं आवश्यक आहे.

हिवाळ्याची चाहूल लागायला लागली, की सर्वांना जास्तीत जास्त उबदारपणा हवाहवासा वाटतो. कडक पाण्यानं आंघोळ करावीशी वाटते. हिटर वापरण्याची इच्छा होते. मात्र, असं केल्यानं त्वचेचा मुलायमपणा आणि स्निग्धता कमी होते. त्वचा अधिक खरखरीत बनते. त्वचेला अॅलर्जीही होऊ शकते आणि मग खाज सुटण्यासारखे प्रकार अनुभवायला येतात. एखादं तेलकट भांडं धुण्यासाठी आपण गरम पाण्याचा वापर करतो आणि ते स्वच्छ होतं, त्याचप्रमाणे कडक पाणी वापरल्यानं त्वचेवरील आवश्यक घटकद्रव्यं निघून जातात. परिणामी, त्वचा कोरडी आणि रूक्ष होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.