'विनामास्क' जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना 'मास्क' घालण्याचा सल्ला

राष्ट्रवादीच्या संवाद यात्रा बैठकीला कार्यकर्त्यांची तोब्बा गर्दी

'विनामास्क' जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना 'मास्क' घालण्याचा सल्ला

निलंगा: कोरोना महामारीचे भयानक संकट देशासमोर उभे असताना सत्ताधारी मंत्र्यांच्या बैठकीत हजारोंचा जनसमुदाय जमवून नियमांची पायमल्ली करणाऱ्या मंत्री व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार का?

निलंगा शहरातील वृंदावन मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंढे, राज्यमंत्री संजय बनसुळे, महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना संसर्गाच्या सामाजिक अंतराचे पालन न करता नेत्यासह पन्नास टक्के कार्यकर्त्यांनी मास्क घातले नव्हते. हजारोची संख्या जमवून तुफान गर्दी जमवून निलंगा वाशीयाच्या आरोग्याचा खेळ केला आहे. यामुळे जनतेमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस वाल्यानी जनतेच्या आरोग्याची खेळ करणे चुकीचे असून जनता अशा नेत्यांना माफ करेल का असा मोठा सवाल निर्माण झाला आहे. सत्तेत असणाऱ्या नेत्यांनीच नियमाचे उलघंन केल्यास येऊ घातलेल्या कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचे भानही मंत्र्यंना राहिले नसून हे जनतेला या लाटेपासून काय वाचवतील असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सदरील कार्यक्रमात पक्षात कोणतीही शिस्त नसल्यामुळे गटबाजीचे प्रदर्शन अधिक होताना दिसत होते. यामुळे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यानाच कार्यक्रच्या सुरवातीला माईक हातात घेऊन कार्यकर्त्यांना सुचना करण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यातही स्वता मास्क न घालता कार्यकर्त्यांना मास्क घालण्याची सुचना केली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चेला उधान आले होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.