परभणी: शेतातील सुरू असलेल्या नांगरटीच्या कामावरुन तिघांनी एका महिलेस घरात घुसून मारहाण केल्याची घटना पुर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथे घडली याप्रकरणी पूर्णा पोलिस स्थानकात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर येथील शेतकरी शंकर पालकर यांचे कुटुंबीय राहते. रविवारी सकाळी ते पत्नीसह घरी असताना भावकीतील शिवाजी मुंजाजी पालकर, पत्नी व आई हे तीघे फिर्यादीचे घरात घुसून ‘तु शेतात नांगरणी करीता ट्रॅक्टर कशाला बोलावला’ असे म्हणून फिर्यादीस शिवाजी याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तिथे उपस्थित असलेल्या शिवाजी याची पत्नी ज्योती पालकर व आई गयाबाई पालकर यांनी फिर्यादी शंकरची पत्नी सुदामतीस केस धरुन जमीनीवर आपटुन अश्लील भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली अशी तक्रार शंकर पालकर यांनी पूर्णा पोलीस स्थानकात दिली. या तक्रारीवरून वरील तिघांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोउपनि वडकर करीत आहेत.