विष पिऊन महिलेची आत्महत्या

पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन खामगाव येथील महिलेची आत्महत्या, मृत महिलेच्या पश्चात दोन लहान मुलं...

विष पिऊन महिलेची आत्महत्या

सुमित दंडुके/औरंगाबाद : येथील खामगावात राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल दि.०२ रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान घडली. रेश्मा गजानन काटकर (वय.३०) असे या महिलेचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा यांच्या भाच्याचे लग्न होते. तेव्हा पतीने तिकडे जाऊन राहून न दिल्यामुळे रेश्मा आणि त्यांच्या पतीमध्ये भांडण झाली. या भांडणाचा राग मनात धरून घरात कोणी नसताना रेश्माने विष प्राशन करून आत्महत्या केली. काही वेळानंतर घरच्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी वडोद बाजार पोलीस ठाण्याला याची माहिती कळवली. पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव यांनी तात्काळ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी वडोद बाजार पोलीस ठाण्यात अकस्मीत मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
मयत रेश्मा गजानन काटकर यांच्या पश्चात ९ आणि ५ वर्षाचे दोन मुले आहेत.

भीषण अपघातात पती-पत्नी ठार, पोलीसांनी फावड्याने उचलले मृतदेहाचे अवशेष
करोडी फाट्याजवळील घटना, अपघात एव्हढा भीषण होता, पोलीसांना फावड्याने उचलावे लागले मृतदेहाचे अवशेष..

Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.