१७ व्या मजल्यावरून खाली पडून, दोन वर्षाच्या मुलासह एका महिलेचा मृत्यू

1 min read

१७ व्या मजल्यावरून खाली पडून, दोन वर्षाच्या मुलासह एका महिलेचा मृत्यू

पोलीसांचा तपास सुरू

दिल्ली: नोएडातील गौतम बुद्ध नगरातील बिसारख पोलिस स्टेशन भागात दु:खद घटना उघडकीस आली आहे. सुपरटेक इको व्हिलेज वनमध्ये 17 व्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे एक महिला आणि दोन वर्षाच्या निरागस मुलाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. सद्यस्थितीत घटनेचे नेमके कारण काय याबाबत माहिती मिळालेली नाही.
बाल्कनीतून महिला आणि मुले कशी पडली याचा पोलिस तपास करत आहेत. पोलिस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत त्या महिलेचा आणि मुलाचा मृत्यू झाला होता.