हायवाच्या धडकेत महिला ठार, एक गंभीर

औरंगाबाद-फुलंब्री मार्गावरील घटना...

हायवाच्या धडकेत महिला ठार, एक गंभीर

औरंगाबाद : औरंगाबादहून फुलंब्रीकडे निघालेल्या दोघी महिलांना समोरुन येणाऱ्या हायवा ट्र्कने जोरदार धडक दिल्याची घटना काल दि.२७ रोजी फुलंब्री-औरंगाबाद रस्त्यावर सावंगीनजवळ घडली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. प्रीती पाटील(वय.३५) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अन्य जखमी महिलेचे नाव कळू शकले नाही.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्कुटीवरुन (एमएच.२०.डीपी.६७३०) दोन महिला औरंगाबादहून फुलंब्रीकडे रविवारी दुपारी जात होत्या. यावेळी स्कुटीला समोरुन येणाऱ्या हायवा ट्रकने (एम.एच.२०.डीई.७५५०) जोरात धडक दिली. यात स्कुटीवरील सदर महिला हायवाच्या चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी झाल्या. जखमी अवस्थेत त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून प्रीती पाटील यांना मृत घोषित केले. तर दुसरी महिला जखमी असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक मुगद्दीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल ए.डी.पाचंगे हे करीत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.