अंगणवाडीतील सुविधांची कामे तात्काळ मार्गी लावा- विशाल जाधव

उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांच्या सुचना...

अंगणवाडीतील सुविधांची कामे तात्काळ मार्गी लावा- विशाल जाधव

परभणी : जिल्ह्यातील अंगणवाडीमधील भौतिक सुविधांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी जिल्ह्यातील बाल प्रकल्प विकास अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

परभणी जिल्हा परिषदेतील महिला व बाल कल्याण विभागात नव्याने रुजू झालेले विशाल जाधव यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारताच मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनात अंगणवाडीतील भौतिक सुविधांची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन बद्ध कार्यक्रमाची आखणी केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाड्या ह्या शौचालय, पिण्याचे पाणी आणि वीज कनेक्शन अशा भौतिक सुविधांनी युक्त असण्याबाबत आग्रह धरलेला आहे.

या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या व लहान बालकांना या सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित बाल प्रकल्प विकास अधिकारी, अंगणवाडीताई, ग्रामसेवक, सरपंच यांची सुनावणी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्याकडे होणार असल्याची माहिती विशाल जाधव यांनी दिली आहे. अंगणवाडीतील वीज कनेक्शन हे १५ व्या वित्त आयोगातून करण्याबाबत सुचविण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण १७०२ अंगणवाड्या पैकी १०८२ अंगणवाडीत शौचालय सुविधा आहे, तर ७८० अंगणवाडीत नळ कनेक्शन देण्यात आलेले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.