शहरात या सात रस्त्यांचे काम लवकरच होणार सुरु

1 min read

शहरात या सात रस्त्यांचे काम लवकरच होणार सुरु

राज्य सरकारने मंजूर केलेल्या १५२ कोटीच्या निधीतून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे असलेल्या सात रस्त्यांची कामे लवकरच सुरू

सुमित दंडुके / औरंगाबाद : राज्य सरकारने मंजूर केलेल्या १५२ कोटीच्या निधीतून राज्य रस्ते विकास महामंडळाकडे असलेल्या सात रस्त्यांची कामे लवकरच सुरू करण्याची तयारी केल्याची माहिती रस्ते विकास महामंडळच्या कनिष्ठ अभियंत्याने दिली आहे. या रस्त्यांपैकीच्या काही रस्त्यांचे भुमीपुजन होऊन प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाली आहे.

हे सात रस्ते खालीलप्रमाणे आहे :-

  • जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते डॉ. सलिमअली सरोवर रस्त्याचे काँक्रीटीकरण.

  • जाफरगेट ते मोंढा नाका व जाफर गेट ते आठवडी बाजार रस्त्याचे कॉक्रीटीकरण.

  • गोपाल टी ते उत्सव मंगल कार्यालय रस्त्याचे कॉक्रीटीकरण व औषधी भवनसमोरील पूल बांधकाम.

  • पोलीस मेस ते कटकटगेट रस्त्याचे कॉक्रीटीकरण.

  • मदनी चौक ते सेंट्रल नाका रस्त्याचे डांबरीकरण.

  • ऐतिहासिक नौबत गेट ते सिटीचौक रस्त्याचे पुलासह काँक्रीटीकरण.

  • वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडी मार्गे सावरकर चौक व सिल्लेखाना रस्त्याचे डांबरीकरण.