प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाचा बोजवारा

अर्धवट काम सोडून ठेकेदाराने काढला पळ पुलाचे काम अर्धवट, खडी उखडली साईट पट्टीच केली नाही

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाचा बोजवारा

निलंगा: प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरू असलेले केळगाव-खडकउमरगा मार्गे बसपूर रस्त्याचे काम अद्यापही अपूर्णच असून या रस्त्याचे तीन ठेकेदार बदले असले तरी सध्या काम करत असलेल्या ठेकेदाराने काढला पळ यामुळे रस्त्याच्या पूर्णत्वेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. काम पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांच्याकडून उदाशिसनता दिसत आहे.

प्रधानमंत्ती ग्रामसडक योजनेतून केळगाव-खडकउमरगा ते बसपूर रस्त्याचे काम मागील दहा वर्षापूर्वी मंजूर झाले होते मात्र हे काम कधी निधीअभावी तर कधी ठेकेदाराच्या वादामुळे प्रलंबीत होते. जवळपास आठ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी सहा कोटीपेक्षा आधिक निधीची तरतूद करण्यात आली आसून सध्या रस्त्याच्या कामाचे मजबुती करण करणे व डांबर काम रस्त्यावरील काही पुलाचे काम करून रस्ता मजबुती करण करणे अदी कामे आंदाजपञकात समाविष्ट आहेत.या रस्त्याचे डांबरी काम पूर्ण झाले आहे आणि केळगाव व खाडकउमरगा या ठीकाणचे पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. शिवाय बसपूर येथून मांजरा नदी पाञावरील पुलापर्यंत डांबरी काम अर्धवट आहे.बसपूर व खडकउमरगा या गावी पूर्वी केलेले सिमेंट काँक्रीटचे काम नवीन ठेकेदारानी खराब झाले म्हणून काढून नवीन सिमेंट रस्ता केला असला तरी या रस्त्यावर पाणी कमी मारल्याने रस्ता उखडून गेला आहे.त्यामुळे नागरिक पूर्वीचाच रस्ता बरा होता असे म्हणत आहेत.याबाबत दोन्ही गावातील नागरिकांनी तोंडी तक्रार करूनही याची दखल घेतली नाही ठेकेदार व अभियंता यांच्यात अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची नागरिकांत चर्चा आहे.यामुळे शासनाच्या योजनेच्या लाखोरूपयाला चुना लागला आहे.

या रस्त्यावरील कांही पूलाची कामे पूर्ण झाली आहेत तर कांही कामे अर्धवट स्थितीत आहेत. हे काम पूर्ण होण्याची मुदत ३० जून २०२१ आहे. संबंधित ठेकेदाराकडून काम करण्याचा वेग अतिशय संथ आसल्यामुळे पूर्वी केलेले काम उखडून जात आहे. रस्त्यावरील खडी उखडून पडल्याने व मुरूम वापरल्याने वाहन आले की गावागावामध्ये मोठया प्रमाणात धुळ उडली जात आहे तर वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही साईटवर साईट पट्ट्यासाठी वापरलेला मुरूम कमी प्रमाणात वापरला जात आहे. सिमेंट रस्ता व साईट पट्ट्याचे बिल ३१ मार्च अगोदर काढण्याची घाई संबंधित ठेकेदार करत असून कामावर अत्यंत कमी प्रमाणात मटेरिअल वापर व निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्ता यामुळे सदरील रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.सदरील रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये अन्यथा रस्तारोको करू असा इशारा केळगाव खडकउमरगा बसपूर येथील नागरिकांनी दिला आहे.

प्रशासकीय पातळीवर कामाचा पाठपुरावा करून घेण्यास प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. शिवाय तालुक्यातील अशी मंजूर आसलेल्या रस्त्याची अशीच आवस्था असून याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.