चिंताजनक..! दिवाळी संपताच औरंगाबादेतील कोरोना रुग्णसंख्या वाढली

1 min read

चिंताजनक..! दिवाळी संपताच औरंगाबादेतील कोरोना रुग्णसंख्या वाढली

काल एकाच दिवशी औरंगाबाद जिल्ह्यात १३८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केलेली होती. त्याची प्रचिती औरंगाबादेत येत असून काल एकाच दिवशी औरंगाबाद जिल्ह्यात १३८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४१ हजार ९१४ वर पोहोचली असून आतापर्यंत १ हजार १२४ जणांचा मृत्यू झाला आहे.
दिवाळीपूर्वी औरंगाबादेतील कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती. दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या ६० च्या आसपास आली होती.
मात्र दिवाळी संपताच या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. बुधवारी औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत ११६ तर ग्रामीण भागात २२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.