तसे बघायला गेले तर, भारतातील अनेक नाइट क्लब मध्ये हिंदी, पंजाबी किंवा इंग्रजी गाने ऐकायला मिळतात ज्या गाण्यांवर लोक थिरकतांना दिसातात. परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, असा एक देश आहे ज्या देशात नाइट क्लब एका अनोख्याच म्हणजेच संस्कृत गाण्यांवर लोक थिरकताना दिसतात.
अर्जेंटीनातील ब्यूनस आयर्स मध्ये ग्रोव नावाचे एक नाइट क्लब आहे. या नाइट क्लबमध्ये गणेश शरणम, गोविंदा-गोविंदा, जय-जय राधा रमन हरी बोल आणि जय कृष्णा हरे यासारखे गाणे आपल्या कानावर पडतील. आश्चर्य म्हणजे या नाइट क्लबमध्ये एकसोबत आठशे लोक थिरकताना दिसतात. या क्लबचे दुसरे वैशिष्टय म्हणजे इथे कुणी तुम्हाला धुम्रपानही करताना दिसणार नाही. आणि ड्रिंक करतानाही दिसणार नाही. इथे येणारयाला फक्त सॅफ्ट ड्रिंक्स, फळांचा रस आणि शाकाहारी जेवण मिळते.