या ठिकाणी जाण्यासाठी करावा लागतो दुस-या देशातून प्रवेश

1 min read

या ठिकाणी जाण्यासाठी करावा लागतो दुस-या देशातून प्रवेश

या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही जहाज किंवा विमानच नाही तर कारचाही वापर करू शकता.

प्वाइंट रॉबर्ट्स हे नाव नक्कीच आपण ऐकले असेल. परंतु अमेरिकेत राहणारया लोकांना याबद्दल चांगल्याच प्रकारे माहित आहे. शहराच्या तुलनेत हे ठिकाण जगभर प्रसिद्ध आहे. येथील लोकांना जरी याबद्दल पुर्ण माहिती असेल तरी हा भाग येथून पुर्णतः वेगळा आहे. इथे  जाण्यासाठी अमेरिकेतील लोकांना आंतरराष्ट्रीय सीमा पार करावी लागते.

प्वाइंट रॉबर्ट्सला अमेरिकेतील पेने-एक्सक्लेव म्हटले जाते. हा एका देशाचा भाग आहे ज्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दुसरया देशातून प्रवेश करावा लागतो. विमान सेवा किंवा जहाजाने प्रवास करणे सोडले तर अमेरिकेतील लोकांना देखील इथे येण्यासाठी कॅनडा पार करावे लागते. हा परिसर एका ग्रामीण भागासारखाच आहे. २०१० च्या जनगणनेनुसार सुमारे १३०० लोकसंख्या आहे. या ठिकाणा बद्दल असा एक गैरसमज आहे की, अमेरिकेतील लोकांनी या ठिकाणी कैद्यांच्या विरोधात ग्वाही देणारया लोकांना ठेवले आहे. या ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही जहाज किंवा विमानच नाही तर कारचाही वापर करू शकता. अमेरिकेतून कारने येणारया लोकांना या ठिकाणी येण्यासाठी दोनवेळा आंतरराष्ट्रीय सीमारेषा पार करावी लागते.

इथे येणारया लोकांसाठी अनेक नियम तयार करण्यात आले आहे. जसे की, तंबाटे आणण्याची परवानगी नाही, परंतु कापलेले तंबाटे आणले जावू शकतात. अमेरिकेतील शेतींना किटक आणि आजांरापासून वाचवण्यासाठी हे नियम तयार करण्यात आले आहे. एवढेच नाही तर मेंढी आणि कुत्र्यांसाठीही अनेक नियम तयार करण्यात आले आहेत.