यामुळे राजाने केला राणीचा शिरच्छेद

1 min read

यामुळे राजाने केला राणीचा शिरच्छेद

राज्य करण्यारया राजानेच आपल्या पत्नीचा शिरच्छेद केला होता. त्यामागे एक अतिशय आश्चर्यकारक ऐतिहासिक कथा आहे.

भारतात राजांचे असे अनेक किल्ले आहेत, जी स्वतः एक अनोखी कथा आहे. हे किल्ले भारताचा गौरव म्हणून ओळखले जातात, तसेच येथे काही रहस्यमय गोष्टी ज्या लोकांना विचार करायला लावतात. असाच एक किल्ला मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आहे. असे म्हणतात की, येथे राज्य करण्यारया राजानेच आपल्या पत्नीचा शिरच्छेद केला होता. त्यामागे एक अतिशय आश्चर्यकारक ऐतिहासिक कथा आहे.

रायसेन किल्ला असे या किल्ल्याचे नाव आहे. ई.स. १२०० मध्ये बांधलेला हा किल्ला डोंगराच्या माथ्यावर आहे. प्राचीन वास्तुकलाचा आणि गुणवत्तेचा हा एक अद्भुत पुरावा आहे, जो आजही पूर्वीप्रमाणेच उभा आहे.

वाळूच्या खडकापासून बनवलेल्या या किल्ल्याला आजूबाजूला खडकांच्या मोठ्या भिंती आहेत. या भिंतींना नऊ दरवाजे आणि १३ बुरुज आहेत. या किल्ल्याचा अप्रतिम इतिहास आहे. अनेक राजांनी येथे राज्य केले, त्यापैकी एक शेरशाह सूरी होता. परंतु हा किल्ला जिंकण्यात त्याचा घाम सुटला होता. चार महिने वेढा घालूनही तो किल्ला जिंकू शकला नाही.

असे म्हणतात की, हा किल्ला जिंकण्यासाठी शेरशाह सूरीने तोफ बनवल्या होत्या. त्यामुळेच त्याचा विजय झाला. परंतु ई.स.१५४३ मध्ये शेरशहाने ते जिंकण्यासाठी फसवणूकीचा प्रयत्न केला होता. असे सांगितले जाते. त्यावेळी या किल्ल्यावर राजा पुराणमलचे राज्य होते. आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्याने पत्नी राणी रत्नावलीला शत्रूंपासून वाचवण्यासाठी तीचा शिरच्छेद केला.

असेही म्हटले जाते की, इथल्या राजाकडे पारस दगड होता, जो लोखंडालासुद्धा सोनं बनवू शकत होता. या रहस्यमय दगडासाठी बरीच युद्धे झाली पण राजा राजसेनचा पराभव झाला तेव्हा त्याने किल्ल्यातील तलावात हा पारस दगड फेकला.

असे म्हणतात की, अनेक राजांनी हा किल्ला कोरून पारस दगड शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यात यश आले नाही. आजही लोक रात्री पारस दगडाच्या शोधात तांत्रिकांना सोबत घेऊन जातात परंतु निराशाच त्यांच्या पदरी पडते. ही कथा या बद्दल देखील लोकप्रिय आहे की दगड शोधण्यासाठी येथे आलेल्या बर्‍याच लोकांनी त्यांचे मानसिक संतुलन गमावले आहे, जिन या पारस दगडाचे संरक्षण करत आहे.

परंतु पुरातत्व विभागाला आजपर्यंत असे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत की, या किल्ल्यात पारस दगड अस्तित्त्वात आहे, परंतु काही कथांमुळे लोक पारस दगडाच्या शोधात गुप्तपणे या किल्ल्यावर पोचतात.