येतोय 'फ्री हिट दणका'

लॉकडाऊननंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा मनोरंजन सृष्टी उभी राहत आहे. याच गोष्टीला लक्षात घेऊन 'फ्री हिट दणका' या चित्रपटाची घोषणा एस.जी.एम या चित्रपट निर्मिती संस्थेने केली आहे.

येतोय 'फ्री हिट दणका'

सुमित दंडुके: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली चित्रपट सृष्टी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लॉकडाऊननंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुन्हा मनोरंजन सृष्टी उभी राहत आहे. याच गोष्टीला लक्षात घेऊन 'फ्री हिट दणका' या चित्रपटाची घोषणा एस.जी.एम या चित्रपट निर्मिती संस्थेने केली आहे.
लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टी फुलत असताना अनेक नवनवीन प्रयोगांसोबतच नवीन विषयावर चित्रपट येताना दिसत आहे. 'फ्री हिट दणका' हा सुद्धा एक भन्नाट विषय घेऊन येत आहे, असे चित्रपटाच्या टिझर पोस्टरवरून दिसत आहे. या चित्रपटाला सुनिल मगरे हे दिग्दर्शन तर संजय नवगिरे हे या चित्रपटाचे संवाद, पटकथा आणि गीत लेखन करणार आहेत. टिझर पोस्टरवरून चित्रपटाची कथा ही मैत्री प्रेम यांची सांगड घालणारी असा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपटाची घोषणा झाली असली तरी या चित्रपटाच्या कलाकारांची नाव सध्या गुलदस्त्यात आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा उमेश नरके, धर्मेंद्र सिंग, प्रसाद शेट्टी, विकास कांबळे, प्रवीण जाधव आणि दिग्दर्शक सुनिल मगरे सांभाळत असून सुधाकर लोखंडे हे या चित्रपटाचे सह निर्माता आहेत. या चित्रपटाचं संगीत बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी केले असून चित्रपटाचे छायाचित्रण वीरधवल पाटील करणार आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.