'योगेश्वरी' कारखान्याचे रोलर पूजन संपन्न

1 min read

'योगेश्वरी' कारखान्याचे रोलर पूजन संपन्न

शेतकऱ्यांच्या विश्वासास तडा देणार नाही -मा.आ.देशमुख

सिद्धेश्वर गिरी /सोनपेठ: पाथरी तालुक्यासह जिल्ह्यात आदर्श वाटचाल करणाऱ्या योगेश्वरी शुगरच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम नुकताच कारखान्याचे जेष्ठ संचालक माजी आ.आर.टी.(जिजा)देशमुख यांच्या हस्ते पार पडला.यावेळी शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र असणारा कारखाना म्हणून आपल्या कारखान्याकडे पाहिल्या जाते.त्यामुळे शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसून अडचणीवर मात करु पण शेतकरी समाधानी राहील हाच ध्यास ठेवू हा संकल्प माजी आ.आर.टी.(जिजा)देशमुख यांनी केला.यावेळी यावर्षी कार्यक्षेत्रात भरपूर प्रमाणात ऊसाची लागवड झालेली असून तोडणी व वाहतूक यंत्रणा भरतीचे कामे पुर्ण झालेले आहेत.तसेच रिपेअर व मेंटेनसची कामे प्रगतीपथावर असुन यावर्षी कारखाना पूर्ण क्षमतेने उसाचे गाळप करणार आहे.तसेच कारखान्यास केंद्र शासनाकडून ४५ के.एल.पी.डी.आसवणी प्रकल्पाची मंजुरी मिळाली असल्याने सदरील प्रकल्प लवकरच चालू होणार असल्याचा मनोदय व्यक्त करत कारखाना १५ ऑक्टोंबरपर्यंत चालू करणार असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास मॅनेजिंग डायरेक्टर रोहीत आर.देशमुख,जनरल मॅनेजर पी.एस.देशमुख, तसेच कारखान्यातील सर्व खातेप्रमुख,उपखातेप्रमुख,कामगार/कर्मचारी उपस्थित होते.