तुम्ही प्रस्ताव द्या मी तात्काळ निधी देतो- खा.ओमराजे निंबाळकर

आढावा बैठकीत खासदाराच्या कार्यकर्ते व अधिकाऱ्यांना सुचना

तुम्ही प्रस्ताव द्या मी तात्काळ निधी देतो- खा.ओमराजे निंबाळकर

निलंगा : शेतकऱ्यांना पिककर्ज वाटपा संदर्भात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यानी आयोजित बैठकीत शेतकऱ्यांना सुरळीत पिककर्ज वाटप करा अशा सुचना बँक अधिकाऱ्यांना केल्या. निलंगा येथील प.स.सभागृहात आयोजित बैठकीत संतोष सोमवंशी उपविभागीय अधिकारी विकास माने तहसिलदार गणेश जाधव गटविकास अधिकारी अमोल ताकभाते आदी पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आढावा बैठकीत बोलताना खा.निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना पिककर्ज वाटपा संदर्भात बँकांनी सरळ व सोप्या मार्गानी ठरवून दिलेल्या उदिष्ठाप्रमाणे पिककर्ज वाटप करावे शिवाय जिरायत व बागायत क्षेञासाठी किती प्रमाणात कर्ज वाटप करता येते सर्व बँकांनी शाखेत दर्शनी भागात लावाव्यात अशा सुचना करून तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकाची कर्जवाटपाची टक्केवारी अतिशय निराशाजनक असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जवाटप चांगले केले असल्याचे कौतुक केले.शिवाय शेतकऱ्यांना पिककर्ज वाटपासंदर्भात रिजर्व्ह व लिड बँकेकडून आदेश दिले असताना ही राष्ट्रीयकृत बँका पिककर्ज देताना शेतकऱ्यांची हेळसांड करतात हे अतिशय निंदनिय बाब आहे.ज्या बँकाकडून कर्ज देण्यास टाळाटाळ केले जाते,महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत शुन्य टक्के व्याजदराने कर्जवाटप करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने खरीप हंगामासाठी प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज देण्याचे उदिष्ट दिले आहे.स्केलआफ फायनान्स यानियमाप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकांनी व सहकारी बँकांनी त्वरित कर्जवाटप करावे अशा सुचना दिल्या आहेत.ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत असतील त्या बँकेत जाऊन मला फोन करा असे जाहिर सांगितले.

या आढावा बैठकीत विविध गावचे सरपंच व कार्यकर्ते यानी रस्ते शिवरस्ते बाबतच्या अडचणीचा पाढा खासदारासमोर मांडल्या विकास कामासाठी राज्य व केंद्र शासनाच्या योजनेतून निधी कमी पडू दिला जाणार नाही प्रस्ताव दाखल करा मी तात्काळ निधी देतो देतो अशी ग्वाही दिली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.