बसवेश्वर चौकात तरुणाचा चाकूने भोसकून खून

जखमी तरुणास उपचारासाठी लातूर येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला

बसवेश्वर चौकात तरुणाचा चाकूने भोसकून खून

लातूर : जिल्ह्यातील उदगीर शहरातील रेल्वे स्टेशन जवळील बसवेश्वर चौकात वोडाफोन केअर सेंटर समोर काल रात्री उशिरा एकाचा चाकूने भोसकण्याची घटना घडली आहे. या गंभीर जखमीला तातडीच्या उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे.

मयत जगदीश किवडे

उदगीर शहरातील श्यामलाल विद्यालयाच्या परिसरात राहणारा सोन्या नाटकरे यांला गांधी नगर येथील जगदीश किंवडे या तरुणांने आरोपीस दादा तू माझ्याकडे का बघतोस असे म्हंटले, तेवढ्यात जगदीश किवडे यास फोन आला फोनवर बोलत असताना आरोपीने कमरेत लपवून ठेवलेला चाकू काढून जगदीश किवडे यांच्या पोटात वार करून जखमी केले. जखमी तरुणास उपचारासाठी लातूर येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला आहे.

आरोपी सोन्या नाटकरे

सुनीता विजय किवडे यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून आरोपीविरुद्ध आज ३० जुलै रोजी शुक्रवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही आय एडके यांच्याकडे देण्यात आला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.