युवकांनी गांधीजींच्या विचारावर चालले पाहीजे- अजयकुमार देशमुख

युवकांनी गांधीजींच्या विचारावर चालले पाहीजे- अजयकुमार देशमुख

सोनपेठ : तालुक्यातील डिघोळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. डिघोळचे उपसरपंच अजयकुमार देशमुख यांनी या जयंतीप्रसंगी गावातील युवकांना कानमंत्र देऊन युवकांनी व्यसनापासून दूर राहून अहिंसेच्या मार्गाने आपले कार्य करत त्याग करणाऱ्या महात्मा गांधी यांच्या विचाराप्रमाणे युवकांनी आपले देशासाठी योगदान दिले तरच देशाचे भवितव्य उज्वल होईल.गांधीजींच्या विचारासोबतच शास्त्रीजींचे विचार हे देशासह शेतकऱ्यांना स्वातंत्र्याची आठवण करुन देणारे होते.जय जवान जय किसानचा नारा देऊन शेतकरी हा सर्वोच्च असल्याचे शास्त्रीजी यांनी दाखवून दिले होते.समता,स्वातंत्र्य,बंधुता,न्याय या वाक्याचे एकत्रीकरण करण्याचे काम या महान राष्ट्रपित्यानी केले.असल्याचे मतही देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. ग्रामसेवक संदीप सोळंके यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सरपंच राधाबाई शिंगाडे ग्रामपंचायत सदस्य वैभव खंदारे,विलास शिंदे,प्रकाश चव्हाण,अरुण शिंदे,भीमा पारेकर,किरण गायकवाड,ग्रामस्थ नागनाथ शिंगाडे,माजी जि.प. सदस्य किसन घोणे,सद्दाम सय्यद नबीसाब शेख,भागवत शिंगाडे,गणेश शिंदे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.