आपची मोठी घोषणा; पंजाबमध्ये सरकार आलं तर...

अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

आपची मोठी घोषणा; पंजाबमध्ये सरकार आलं तर...

नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीपुर्वी आम आदमी पक्षाकडुन मोठी घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या पंजाब दौऱ्यावर आहेत. पंजाबमधील मोगा इथं एका संभेला संबोधित करताना केजरीवाल यांनी मोठं आश्वासन दिलं आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास प्रत्येक महिलेला दरमहा १००० रुपये दिले जातील, असं आश्वासन केजरीवाल यांनी दिलं आहे. पेन्शन व्यतिरिक्त हे पैसे मिळणार आहेत, ही जगातील सर्वात मोठी महिला सक्षमीकरण मोहीम असेल असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, माझे विरोधक म्हणतील पैसे कुठून येणार? फक्त पंजाबमधून माफिया संपवायचे आहे, पैसे येतील. मुख्यमंत्री विमान खरेदी करतात. मी खरेदी केली नाही. मला तिकीट मोफत मिळाले. केजरीवाल जे बोलतात तेच करतात. ही निवडणूक पंजाबचे भवितव्य बदलू शकते, असे अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, यावेळी वडील किंवा पती कोणाला मत द्यायचे हे सांगणार नाही. त्यापेक्षा महिलाच ठरवतील कोणाला मतदान करायचे. यावेळी केजरीवालांना एक संधी देऊन बघा, असे धरातील सर्व महिलांनी सांगावे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.