इंधन दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

पेट्रोल डिझेलचे दर कमी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा..

इंधन दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन

विजय कुलकर्णी/ परभणी : राज्यात पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज सायकल रिक्षा चालवुन निषेध व्यक्त करण्यात आला.

आंदोलनाचे नेतृत्व परभणी शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अकबर जागीरदार यांनी केले. यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनात मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येत्या काळात पेट्रोल डिझेलचे दर कमी न झाल्यास युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर कमी असतानाही परभणीत सुमारे ९७ रुपये पेट्रोलचा दर आहे. याबद्दल रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी शेख मतीन, सईद अहेमद, राजेश रेंगे, वैजनाथ देवकते, मो.ईलीयास, शेख युनुस, शेख नाजेम, श्रीराम जाधव, दिगंबर खरवडे आदींची उपस्थिती होती.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.