युवक प्रतिष्ठाणच्या पदाधिकारी निवडी जाहीर.

1 min read

युवक प्रतिष्ठाणच्या पदाधिकारी निवडी जाहीर.

सोनपेठ तालुकाअध्यक्षपदी नवनाथ भारती यांची तर प्रतिष्ठाणचे विधिसल्लागार म्हणुन दत्ता गिरी,उखळीकर यांची निवड.

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: दशनाम गोसावी युवक प्रतिष्ठानच्या नूतन निवडी नुकत्याच जाहीर झाल्या. यात सोनपेठ तालुकाध्यक्षपदी नवनाथ भारती,गंगाखेड तालुकाध्यक्षपदी अवधूत पूरी,गंगाखेड शहर अध्यक्षपदी शिवम गिरी यांच्यासह विधी सल्लागार म्हणून अँड.दत्ता गिरी,उखळीकर यांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. मागील अनेक दिवसांपासून समाजावर अन्यायाची मालिका वाढलेली असून समाजातील शेवटच्या घटकावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध एकत्र येऊन काम करणे.समाजातील तरुण बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करुन देणे,तर काहींना व्यवसायिक दृष्टीकोन ठेवून मदत करणे. या वैचारिक दृष्टिने उभारणी झालेल्या दशनाम गोसावी युवक प्रतिष्ठाणची बांधणी संदीप गिरी कान्हेगावकर,पत्रकार अनिल पूरी,शाम गिरी,जिल्हाध्यक्ष स्वप्निल(भैय्या)भारती यांच्यासह आदींच्या माध्यमातून चालु आहे. समाजातून यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती.यात वरील नियुक्त्या पार पडल्या आहेत.नवनियूक्त पदाधिकारी यांना प्रतिष्ठाणच्या वतीने नियूक्तीपत्र व पुष्पगुच्छ देउन, त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी समाजातील प्रतिष्ठितांची उपस्थिती होती.