युवतीची हत्या करणा-या आरोपीविरुद्धचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा – ए.जे बोराडे

1 min read

युवतीची हत्या करणा-या आरोपीविरुद्धचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा – ए.जे बोराडे

मुस्लिम माथेफिरू युवकाने हिंदू धर्माच्या नवविवाहित युवतीची केली हत्या

प्रतिनिधी/मंठा: शहरात 30 जून रोजी मुस्लिम माथेफिरू युवकाने हिंदू धर्माच्या नवविवाहित युवतीची हत्या केल्याचे पडसाद मंठा शहरात उमटले युवतीची हत्या करणा-या आरोपीविरुद्ध चा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख बोराडे यांनी सांगितले. घटनेच्या निषेधार्थ मंठा शहरातील व्यापारी बांधवांनी कडकडीत बंद पाळला सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील नागरिकांनी मंठा टी पॉईंट ते पोलीस स्टेशन पर्यंत मूक मोर्चा काढून तहसीलदार सुमन मोरे आणि पोलिस निरीक्षक विलास निकम यांना निवेदन दिले. घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या अमानवीय कृत्याचा जिल्हाप्रमुख
ए.जे.बोराडे यांनी तीव्र शब्दात निषेध केला. मन सुन्न करणारी घटना अशा शब्दात जिल्हाप्रमुख ए जे बोराडे यांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी मंठा पोलिस स्टेशन येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.
घटनेचे गांभीर्य प्रत्येकाच्या चेह-यावरून दिसत होते यावेळी भाऊसाहेब गोरे ,संतोष वरकड ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजेश मोरे ,कैलास बोराडे ,नितीन राठोड, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब बोराडे, व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष भारत शेठ बोराडे ,अरुण वाघमारे ,शिराज पठाण , मुसा भाई कुरेशी, कयूम कुरेशी ,प्रदीप बोराडे ,इल्यास कुरेशी ,वैजनाथ बोराडे ,सचिन बोराडे, गणेश राव बोराडे ,शबाब कुरेशी ,व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बालासाहेब बोराडे, अशोक खरात, शिवाजीराव सुरवसे ,सोपानराव घनवट ,बालासाहेब घनवट, सुरेश घनवट ,विष्णू घनवट ,यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू जागरण मंचच्या वतीने निवेदन देण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी सोपान बांगर पोलीस निरीक्षक विलास निकम उपनिरीक्षक विजय जाधव ,नितीन गट्टूवार ,यांच्यासह कर्मचा-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.WhatsApp-Image-2020-07-02-at-4.24.50-PM-1