गायक मिका सिंग पंजाबमध्ये करतोय गुपचूप लग्न? 

सुप्रसिद्ध गायक मिका सिंगच्या गाण्याचे लाखो चाहते आहेत. त्याने आजवर सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली. त्याची गाणी अगदी थिरकायला लावणारी असतात. आपल्या कामामुळे मिका सतत चर्चेत असतो. त्याशिवाय मिकाचं खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. राखी सावंतबरोबर त्याचा झालेला वाद तर जगजाहिर आहे. पण सध्या चर्चा रंगत आहेत ती त्याच्या लग्नाची. सोशल मीडियावर सतत व्हायरल होणारे व्हिडीओ पाहून मिका गुपचूप लग्न करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मिकाचा हा व्हिडीओ पंजाब येथे असणाऱ्या त्याच्या रोपर या गावामधील आहे. गावामध्ये मिका प्रवेश करताच नवरी मुलगी त्याचं जंगी स्वागत करते. तसेच मिका देखील नाचू लागतो. असं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. मिका गुपचूप लग्न करत असल्याचं हा व्हिडीओ पाहून चर्चा होत असली तरी यामध्ये काहीच तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. मिका त्याचा आगामी शो ‘स्वयंवर – मिका दी वोहटी’साठी एक म्युझिक व्हिडीओ शूट करत आहे. त्याचदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत.

Share