डॉ . अमोल कोल्हेंचा राजीनामा !

अजित पवार यांनी केलेल्या राष्ट्रवादी च्या फोडीनंतर पक्षातले आमदार, खासदार, विविध अध्यक्ष , कार्यकर्ते नेमकी कोणाच्या गटात जाणार याबाबत चढ उतार दिसून येत आहेत . अजित दादा ९ जनांसह मंत्रिपदाची शपथ घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले . त्यांच्या मते जास्तीत जास्त आमदार त्यांच्यासोबत असून राष्ट्रवादी पक्षावर त्यांनी दावा ठोकला आहे तर याउलट शरद पवारांच्या शिल्लक राष्ट्रवादी चे प्रवक्ते जयंत पाटील यांच्यामते मंत्रिपद मिळालेले आमदार सोडता सर्वच त्यांच्या सोबत आहेत .

त्यातच मंत्रिपदाची शपथ समारोहात उपस्थित असलेले खासदार अमोल कोल्हेंनी आज खासदारकीचा राजीनामा दिला आहे . त्यांच्या मते महाराष्ट्रात चालू असलेले हे फोडाफोडीचे राजकारण नैतिकतेला धरून नाही व त्यामुळेच मी राजीनामा देतोय . तसेच मी शरद पवार साहेबांसोबत आहे असेही त्यांनी नमूद केले.

डॉ.अमोल रामसिंग कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते व राजकारणी आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेपासून ते प्रसिद्ध झाले. तसेच ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली होती. २०१९ मध्ये ते शिरुर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेत.

Share