माझ्यासाठी हि दुसरी वेळ !- आ.धनंजय मुंडे .

आज वांद्र्यातील एमईटी संस्थेत अजित दादांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडत असताना अनेक दिग्गज आपलं मनोगत व्यक्त करत आहेत . त्यात छगन भुजबळ , सुनील तटकरे , धनंजय मुंडे आदींचा समावेश आहे . दुसरीकडे त्याच वेळी शरद पवारांच्या गटाची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडत आहे .

यावेळेस मत मांडताना धनंजय मुंडे म्हणाले कि हि वेळ त्यांच्या आयुष्यात दुसऱ्यांदा आली अर्थात जेव्हा गोपीनाथ मुंडेंचं नेतृत्व नाकारून भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केला . तसेच हा निर्णय घेताना मनात वेदना असल्याचं देखील त्यांनी कबुल केलं . तसेच ते म्हणाले दादांनी मनातील खदखद व्यक्त करावी व आपल्या निर्णयाचं कारण मायबाप जनतेसमोर मांडावं .

Share