दोन दिवसाआधी झालेल्या राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्रात विविध स्तरांवरून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत . मागच्याच वर्षी एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडत भाजपासोबत सरकार स्थापन केले . त्यानंतर शिवसेना हि दोन गटात विभागली गेली . कार्यकर्ते , नेते , पक्ष चिन्ह यावरून दोन्ही गटामध्ये संघर्ष पाहावयास मिळाला .
या घटनेला वर्ष उलटतो तोवर विरोधी पक्ष नेते असलेले राष्ट्रवादी काँग्रेस चे अजित पवार यांनी पदाचा राजीनामा देत पक्षातील ९ आमदारांसह मंत्रिपदाची शप्पत घेत शिंदे फडणवीस सरकारमध्ये हातमिळवणी केली . अशाप्रकारे महाराष्ट्रात सध्या भाजप , शिंदेंची शिवसेना , अजित दादांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाची एकत्र सरकार आहे . जे एकमेकांविरोधात निवडणूक लढले ते सत्तालाचारीसाठी एकत्र आले अश्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून येत आहेत.
त्यातच काल मुंबई तर आज ठाण्यात उद्धव – राज एकत्र या असे बॅनर झळकताना दिसले . राजकारणाचा चिखल झाला आहे असेही त्यावर नमूद केले होते . या भूकंपानंतर काय काय बदल व राजकीय घडामोडी घडतात हा येणारा काळच सांगेल .