नवी दिल्ली : गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल याने काॅंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. गुजरातमधील गांधीनगर येथील भाजपाच्या मुख्यालयात त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. यावेळी गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हार्दिक पटेल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देशहित आणि राज्याच्या हिताची कामे करण्याबरोबरच आपल्या नवीन राजकीय प्रवासाला सुरुवात करत आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘छोटा शिपाई’ आहे, असे ते म्हणाले. हार्दिक पटेल याच्यासह पाटीदार आंदोलनातील त्यांचे सहकारी आणि अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Hardik Patel who recently quit Congress joins BJP in Gandhinagar, Gujarat pic.twitter.com/JT6UtIPPJg
— ANI (@ANI) June 2, 2022
दरम्यान हार्दिक पटेल आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात येतंय. हार्दिक सौराष्ट्रातील मोरबी किंवा अहमदाबाद जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावामधील विरमगाम मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. त्यानं भाजपकडून निवडणूक लढवण्याचे संकेतही दिले आहेत.