नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.चीन, अर्जेंटिना, ब्राझील आणि जपानमध्येही कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. जगभरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेत भारत सरकारनेही यासंदर्भात आढावा बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज देशातंर्गत कोविड तयारीबाबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशात पुन्हा कोरोना निर्बंध?
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी देशातील कोरोना परिस्थितीबाबत वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांची बैठक बोलावली आहे. एएनआय वृत्तसंस्थेना दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक ११:३० वाजता सुरू होईल. या बैठकीमध्ये इतर देशांतील कोरोना परिस्थितींचाही आढावा घेण्यात येईल. यानंतर परिस्थिती पाहता नवे निर्बंध लागू होण्याबाबत निर्णय होऊ शकतो.
Union Health Minister Dr Mansukh Mandaviya to hold a meeting with senior officials and experts on the COVID-19 situation in the country tomorrow: Sources pic.twitter.com/8CYmNaIHS8
— ANI (@ANI) December 20, 2022
चीनमध्ये कोरोनाची तिसरी लाट
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातलं आहे. झिरो कोविड पॉलिसी शिथिल होताच गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. रुग्णांची आणि मृतांची संख्या इतकी वाढली आहे की, रुग्णालय आणि अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे एप्रिल महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी मोठी लाट चीनमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात १० लाखांहून अधिक व्यक्तींचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चीन संपूर्ण जगासाठी डोकेदुखी ठरू शकतो.