पण त्यांची गुर्मी कधी जाणार नाही; विजय शिवतारे

महाविकास आघाडीचा सरकार असताना भोरमध्ये सगळी काम ठप्प झालेली. कारण निधीवाटप चुकीच होतं. संग्राम थोपटे काँग्रेसचे आहेत. भोरच्या जनतेसाठी मुख्यमंत्र्यांना सांगून विकास कामांवरची स्थगिती उठवली. लोकांची काम झाली पाहिजेत, असं विजय शिवतारे यांनी म्हणत शरद पवारांवर हल्लाबोल केला.बारामतीमध्ये दुसरी आडनाव नाहीत का?. पाच मतदारसंघातून पवार नावाशिवाय दुसरा कोणी प्रतिनिधीत्व करु शकत नाही का?. बारामतीमध्ये हजारो आडनाव आहेत, ते का नको? आम्ही परत पवारांना का मतदान करायच? आम्हाला तुम्ही काय दिलं? असा सवाल शिवतारेंनी केला. तर यांनी सर्व प्रकल्प बारामती शहरात आणले. बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात प्यायला पाणी नाही. कसला विकास केला तुम्ही?. जे यांना 50 वर्षात जमलं नाही, ते विजय शिवतारे 5 वर्षांत करुन दाखवेल, असा शब्दही शिवतारेंनी दिला.

शिवसेना शिदे गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवारांना आव्हान देत बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याने अजित पवारांना ते अडचणीचं जाणार असल्याचं बोललं जातंय.

अजित पवार युतीमध्ये आल्यानंतर मी स्वतः त्यांना भेटायला गेलो, त्यांचं स्वागत केंल. पण त्यांची गुर्मी कधी जाणार नाही. माझ्याकडून हे काम करून घेण्यासाठीच मला ही संधी मिळत आहे. 2014 साली महादेव जानकरांच्या ठिकाणी मी उभा असतो तर त्याचवेळी मी निवडून आलो असतो. बारामती कुणाचा सातबारा नाही, घराणेशाहीच्या विरोधात हा लढा आहे. या निवडणुकीकडे मी वैयक्तिक वैर म्हणून लढत नाही.नमो रोजगार मेळाव्याच्या वेळी तीन बुके घेऊन मी गेलो होतो. अजित पवारांना बुके दिल्यावर त्यांनी तो लगेच बाजूला ठेवला, त्यांना कसलीही माणूसकी नाही. एवढा गर्व मी कुठेच पाहिला नाही. असे विजय शिवतारे म्हणले.

Share