आयपीएल 2024 चा दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदीगड येथे खेळवला जात आहे. पंजाब संघाचे हे नवे घरचे मैदान आहे ज्यावर संघ खेळणार आहे. यापूर्वी मोहाली हे पंजाब संघाचे होम ग्राउंड होते. या सामन्यासह दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत तब्बल 15 महिन्यांनंतर मैदानात परतत आहे. दरम्यान, पंंजाबने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा.
या लढतीत पंजाबचा कर्णधार शिखर धवनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दिल्लीचे नेतृत्व पुन्हा एकदा ऋषभ पंतकडे आले आहे. अपघातानंतर जवळ जवळ दीड वर्षाने तो मैदानात परतला आहे. त्यामुळे पंतची आणि दिल्लीची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष असेल.