पिपंरी चिचवड : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काॅँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्ष कविता आल्हाट आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक वसंत बोराटे यांचा पक्षप्रवेश झाला. #पक्षप्रवेश #NCP pic.twitter.com/MmuXTd3yva
— NCP (@NCPspeaks) February 17, 2022
वसंत बोराटे हे २०१७ साली मोशी भागातून भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. मागील पाच वर्षात मोशी-जाधववाडीतील विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते. ते झाले नाही. परिणामी, विकास कामांना गती मिळाली नाही. अपेक्षित कामे झाली नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला असल्याचे वसंत बोराटे यांनी सांगितले.