UP Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे. यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पाचवा टप्पा पार पडणार आहे. या मध्ये ६१ जागांसाठी ६९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पाचव्या टप्प्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या
Voting for fifth phase of #UttarPradeshElections begins; 692 candidates in 61 assembly constituencies across 12 districts in fray.
Voters to decide fate of Dy CM Keshav Prasad Maurya, minister Sidharth Nath Singh, Congress Legislature Party leader Aradhana Mishra & others today. pic.twitter.com/rZ84G7xdYm
— ANI (@ANI) February 27, 2022
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज १२ जिल्हातील ६१ जागांवर मतदान होणार आहे. ६१ जागांसाठी ६९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्याचे राजकीय भवितव्या आज मतपेटीत बंद होणार आहे.
पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज होणाऱ्या पाचव्या टप्प्यात ६१ जागांसाठी ६९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी ९० महिला उमेदवार आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी यूपीमध्ये सुमारे २.२४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १.२० कोटी पुरुष, १.०५ कोटी महिला आणि १ हजार ७२७ तृतीय लिंग (ट्रान्सजेंडर) मतदार आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात अमेठी, रायबरेली, सुलतानपूर, चित्रकूट, प्रतापगड, कौशांबी, प्रयागराज, बाराबंकी, अयोध्या, बहराइच, श्रावस्ती आणि गोंडा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे.
Deputy CM and BJP candidate from Sirathu, Keshav Prasad Maurya visits a polling booth in the constituency as voting for the fifth phase of #UttarPradeshElections continues. pic.twitter.com/LzocYGbT0o
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 27, 2022